रोज ब्रश करणे हे आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर असते. याने तोंडाची व दातांची योग्यप्रकारे स्वछता होते. त्यामुळे प्रत्येकाने किमान दिवसातून दोनदा दात घासणे गरजेचे आहे. पण ते योग्य प्रकारे घासणे गरजेचे. कारण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या काही दात घासण्याचा चुकीच्या सवयींमुळेही दाताच्या समस्या वाढतात.
यामुळे दात दुखणे, हिरड्यांचा त्रास होणे अशा अनेक समस्या वाढतात. त्यामुळे तुम्ही दात घासताना योग्य प्रकारे दात घासणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ दात घासताना कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे.
हार्ड ब्रश
हार्ड ब्रश तुमचे दात आणि हिरड्या खराब करू शकतात. त्यामुळे, तुमचे दात साफ करताना मऊ ब्रश निवडणे चांगले आहे, ज्याचे डोके लहान किंवा सामान्य आहे जेणेकरून ते सहजपणे तुमच्या जबड्याच्या टोकापर्यंत पोहोचू शकेल आणि दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकेल. यामुळे दात दुखण्याची समस्या होणार नाही.
टूथपेस्ट अधिक प्रभावी
जर दातांवर थोडी टूथपेस्ट वापरत असतील तर ते पुरेसे आहे. यासोबतच काही लोक ब्रशमध्ये भरपूर टूथपेस्ट वापरतात. पण यामुळे तोंडात आग होऊन तोंडाचे चट्टे निघतात त्यामुळे तुमचे दात चांगले करण्यासाठी, तुम्ही टूथब्रशवर थोड्या प्रमाणात टूथपेस्ट लावा.
जास्त वेळ व वेगाने दात घासणे
अनेकांना असे वाटते की त्यांनी जास्त वेळ दात घासले तर ते त्यांच्या दातांसाठी निरोगी राहतील. पण आम्ही तुम्हाला सांगतो की फक्त ५ मिनिटे घासणेही आपल्या दातांसाठी पुरेसे आहे. हे तुमच्या दातांमधील उरलेले अन्न पदार्थ देखील काढून टाकते. पण जास्त वेळ व वेगाने दात घासल्याने दातांमध्ये पोकळी तयार होते व दाताच्या वेदना सुरु होतात.