मिलिंद सोमण वयाच्या ५६ व्या वर्षीही आपल्या फिटनेसने तरुणांना लाजवतो. पण आज मॉडेल आणि अभिनेता मिलिंदबद्दल नाही तर त्याच्या आईबद्दल बोलत आहोत.

उषा सोमण वयाच्या ८३ व्या वर्षीही खूप तंदुरुस्त आहे आणि २५ वर्षांनंतर त्यांनी बीचवर सायकलिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मिलिंदने त्याच्या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो पाहताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि हा व्हिडीओ प्रेरणादायी असल्याचे सांगत आहेत.

असं म्हणतात की आई ही मुलांची पहिली गुरु असते. मिलिंद सोमणच्या आईला पाहिल्यानंतर तुमचाही त्यावर विश्वास बसेल. मिलिंद त्याच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असतो, पण त्याची आई देखील वयाच्या ८३ व्या वर्षी आपल्या फिटनेसने सर्वांना चकित करत आहे. मिलिंदने त्याची आई उषा सोमण यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंदची आई पूर्ण उत्साहात समुद्रकिनाऱ्यावर सायकल चालवत आहे.

मिलिंद सोमणने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जवळपास 25 वर्षांनंतर सायकल चालवत आहे. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करत राहा आणि त्याचा नियमित सराव करा, 83 वर्षाही वाईट नाही.”

मिलिंद सोमणच्या आईच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम देत आहेत. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्हा सर्वांना बीचवर भेटून खूप छान वाटले. या वयात तुमचा सायकलस्वार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” हा व्हिडीओ पहिल्यानंतर कोणी तिला पॉवरफुल लेडी म्हणत आहेत तर कोणी तिला क्यूट म्हणत आहेत. एकाने लिहिले, ‘यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही’.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *