यंदाची गणरायाची आगमनची तारीख जवळ आली असून ते या महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ ऑगस्टला बसणार आहे. गणेशोत्सव म्हंटलं सर्वत्र लगबग पाहायला मिळते. प्रत्येकजण आपल्या घरी बाप्पाची स्थापना करून हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात.

बरेच लोक बाजारातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणतात याचा पर्यावरणावर परिणाम होतो. यामुळे पर्यावरण राखण्यासाठी बाजारातील मूर्तींऐवजी आपण यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक म्हणजेच इकोफ्रेंडली साजरा केला पाहिजे.

अशा पर्यावरणपूरक मूर्तीं तुम्ही घरीही बनवू शकता. यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यातून तुम्ही घरच्या घरी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवू शकता.

घरच्या घरी अशा प्रकारे बनवा इको फ्रेंडली मूर्ती

मातीपासून मूर्ती बनवा

-घरच्या घरी इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेल्या शाडू मातीचा वापर करू शकता.
-मूर्ती बनवण्यासाठी आधी एक छान चौकोनी लाकडाचा तुकडा निवडा ज्यावर मूर्तीची स्थापना केली जाईल.
-मूर्ती बनवण्यासाठी माती स्वच्छ करून त्यात पाणी घालून माती पिठासारखी चांगली मळून घ्यावी.
-चिकणमाती थोडा वेळ विश्रांतीसाठी ठेवा आणि सुमारे 1 तासानंतर मातीपासून मूर्तीचा आकार तयार करा, मूर्तीला आकार दिल्यानंतर, मूर्तीमध्ये एक लहान सोंड आणि हात-पाय घाला आणि कोरडे राहू द्या.
-जेव्हा मूर्ती पूर्णपणे सुकते तेव्हा तुम्ही तिला जलरंगाने रंगवू शकता. पाण्याचा रंग पक्का होण्यासाठी फेव्हिकॉल टाकता येते.
-मूर्तीला रंगांनी सजवल्यानंतर फुलांच्या माळा आणि मोत्याचे छोटे दागिने घालून देवाला सजवावे.