प्रत्येकजण रोज मोठेमोठे बँकिंग व्यवहार करत असतात. बऱ्याचदा लोक बँकेतून पैसे काढतात मात्र घाईघाईत पासबुक प्रिंट करायचे राहून जाते. यामुळे खतायत किती शिल्लक आहे हे समजत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की आधारच्या मदतीनेही घरबसल्या तुम्ही स्वतःचा बँक बॅलन्स तपासू शकता.

कारण आधार क्रमांक हा सर्वच आवश्यक कागदपत्रांशी लिंक केला जातो. त्यातीलच एक म्हणजे बँक खाते. भारतातील नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासात येते. जर तुम्हाला तुमची आधार लिंक्ड खाते शिल्लक तपासायची असेल, तर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

आधार वापरून तुमची बँक शिल्लक कशी तपासायची

इंटरनेट कनेक्शन नसल्यास ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरेल. याशिवाय, तुम्ही स्मार्टफोन तसेच फीचर फोनवर तुमची बँक बॅलन्स तपासण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करू शकता.

-सर्वप्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9999*1# डायल करा.
-त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
-नंतर तुमचा आधार क्रमांक सत्यापित करण्यासाठी तो पुन्हा प्रविष्ट करा.
-यानंतर UIDAI तुम्हाला एक फ्लॅश एसएमएस पाठवेल. तो फ्लॅश संदेश स्क्रीनवर बँक शिल्लक दर्शवेल.

आधार वापरकर्ते केवळ 12 अंकी क्रमांक वापरून त्यांचे बँक शिल्लक तपासू शकत नाहीत. त्याऐवजी आधार वापरून पैसे पाठवणे, सरकारी अनुदानासाठी अर्ज करणे आणि पॅन कार्डसाठी अर्ज करणे अशा अनेक गोष्टी करू शकतात.