प्रत्येकजण दिवसभर काम करून थकलेले असतात. या थकव्यातून, ताणातून शरीराला शांती मिळण्यासाठी रात्रीची झोप ही खूप फायदेशीर मानली जाते. मात्र अनेकांना दिवसभर काम करून देखील रात्री लवकर झोप येत नाही. पण हि आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे वेगवेगळ्या आजारांच्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हालाही दिसभराच्या ताण तणावामुळे रात्रीची झोप लागत नसेल, तर यासाठी तुम्ही घरगुती उपाय करूनही झोपेची समस्या दूर करू शकता. यासाठी तुम्ही स्ट्रेस बस्टर सॉल्टचा वापर करू शकता. याच्या वापराने तुम्ही रात्री पटकन व शांत झोपू शकता.

यासाठी असे स्ट्रेस बस्टर सॉल्ट तुम्ही घरी बनवू शकता, जे झोपण्यापूर्वी काही मिनिटे जिभेखाली ठेवावे लागते. असे केल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि मन शांत होते. हे मीठ बनवण्यासाठी ही पद्धत अवलंबा.

ताण दूर करण्याचे मीठ बनवण्यासाठी

१ चमचा मीठ
१ चमचा साखर
अडीच चमचे मध

या सर्व गोष्टी एकत्र करा आणि हे मिश्रण चमच्याने झोपण्यापूर्वी जिभेखाली ठेवा. थोड्याच वेळात तुम्हाला मानसिक शांती आणि आराम मिळेल. वाटल्यास मीठ आणि साखर समप्रमाणात मिसळून अर्धा चमचा हे मिश्रण घ्या आणि झोपण्यापूर्वी त्यात दीड चमचा मध टाकून सेवन करा.

असे कार्य करते

हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की साखर, मीठ आणि मध यांचे हे मिश्रण तुम्हाला लवकर झोपायला कशी मदत करते. उत्तर असे आहे की साखर आपल्या मेंदूला सिग्नल पाठवून कार्य करते की तिने तणाव संप्रेरक स्राव करू नये. तर मीठ अॅड्रेनालाईन हार्मोनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मध लवकर मन शांत करण्यासाठी उपयुक्त आहे.

Leave a comment

Your email address will not be published.