उन्हाळ्यात घामाच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. यावेळी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने घामाची चिपचिप सतत सुरूच असते. उन्हाळ्यात शरीराला पुरेशी हवा न लागल्यानेही घाम येतो. यामुळे संपूर्ण शरीरातून घामाचा दुर्गंध येत असतो. यामुळे अनेकजण घामाच्या समस्येने हैराण होतात.यासाठी अनेकजण महागडे परफ्यूम, सेंट वापरतात पण याचा काहीच फायदा होत नाही.

त्यासाठी घामावर काही घरगुती उपायांनीही नियंत्रण मिळवता येते. तर आज आम्ही तुम्हाला घामावर नियंत्रण मिवण्यासाठी काही घरगुती पद्धती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ, घामाची समस्या दूर करण्यासाठी घरगुती पद्धती कशाप्रकारे फायदेशीर ठरतात.

घामापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. शरीराच्या ज्या भागावर तुम्हाला खूप घाम येतो त्या भागावर बटाट्याचे तुकडे चोळा. याने घामाची समस्या कमी होईल.

जास्त घाम येत असेल तर रोज सकाळी व संध्याकाळी आंघोळ करण्याची सवय लावा. त्याचबरोबर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस घालू शकता. याने पाण्यावाटे तुमच्या शरीरातील घाण निघून तुमचे शरीर स्वच्छ होईल.

शरीरात योग्य पाण्याची मात्र असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल, तसेच घामामुळे डिहायड्रेशनची समस्याही होणार नाही.

रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश करा, तसेच टोमॅटोचा रस प्या. याने शरीराला थंडावा मिळतो व त्यामुळे जास्त घाम येण्याची समस्या कमी होते. तसेच तुम्ही ग्रीन टी ही पिऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *