बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बाबत एकमहत्वाची बातमी समोर आली आहे. सलमानला एका अभिनेत्रीने चक्क धमकी दिली असल्याचे समोर येत आहे.

सोमी अली असे या अभिनेत्रींचे नावे आहे. सोमी अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं सलमान खान आणि भाग्यश्रीच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमातील एक स्क्रिन शॉटशेअर केला आहे.

हा शॉट शेअर करत सोमीनं लिहिलं आहे की, ‘बॉलिवूडमधील हार्वी वीन्सटीन…एक दिवस तुझा देखील पर्दाफाश होईल. ज्या ज्या महिलांबरोबर तू वाईट वागला आहेस, त्यांचं शोषण केलं आगे.

एक दिवस त्या सगळ्याजणी पुढं येऊन सत्य सांगतील. जसं ऐश्वर्या राय बच्चन हिनं केलं होतं…’ दरम्यान सलमान खानचं नाव आतापर्यंत संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय यांच्याबरोबर जोडण्यात आलं आहे.

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. इतकंच नाही तर त्यानंतर सलमाननं दारूच्या नशेच ऐश्वर्याला माराहाण केल्याचीही खूप चर्चा होती.

सलमानवर असेच काहीसे आरोप त्याची आधीची गर्लफ्रेंड सोमी अली हिनं देखील केले आहेत. सोमीनं सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल काही गंभीर खुलासे केले आहेत.

कोण आहे सोमी अली मूळ पाकिस्तानी असलेली सोमी ही अमेरिकन नागरिक आहे. सोमीला सलमान खान खूप आवडायचा. त्यामुळेच ती १६ व्या वर्षी भारतामध्ये आली.

सोमी काही काळ सलमानची गर्लफ्रेंड होती. परंतु त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *