आजकाल मुलं खूप घाईघाईत लग्न करतात. पण लग्नासाठीचा उतावळेपणा तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. कारण बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने दोन दिवसातच प्रियकरासोबत धूम ठोकली.
या नववधूने फरार होण्यापूर्वी पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. व तिने घरात ठेवलेले लाखो रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कमही घेऊन गेली. या घटनेनंतर वराच्या कुटुंबियांना चांगला धक्काच बसला आहे.
याबाबत पीडित वराने भबुआ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गावातील रहिवासी मनोहर प्रजापती यांचा मुलगा अमित कुमार याने रोहतास जिल्ह्यातील करहागर पोलीस स्टेशन हद्दीतील बाकसरा गावातील रहिवासी अवधेश प्रजापती यांच्या मुलीसोबत 09 मे रोजी प्रेमविवाह केला होता. 10 मे रोजी अमितने वधूसोबत लग्न केले आणि तिला गावातून आणले.
घरात आनंदाचे वातावरण होते. पण सुनेच्या मनात वेगळंच काही चाललंय हे कुणालाच कळत नव्हतं. मधुचंद्राच्या दिवशी नववधूने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या, त्यामुळे त्याला झोप लागली.
एवढेच नाही तर इतर नातेवाईक काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यामुळे तिने घरात ठेवलेले दागिने आणि 30 हजारांची रोकड उचलून तेथून पळ काढला. नवविवाहित नवरीचे पती अमित कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, १२ मे रोजी दुपारी पत्नी प्रीती कुमारी आपल्या प्रियकरासह घरात ठेवलेले दागिने आणि ३० हजारांची रोकड घेऊन पळून गेली. 24 तासांनंतर मी व्हिडिओ कॉल केला आणि म्हणालो- मला वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे येईन, मला वाटले नाही तर मी येणार नाही.
या घटनेनंतर भाबुआ पोलिस ठाण्यात लेखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी पोलीस दरोडेखोर नवरीचा मोबाईल क्रमांक पाळत ठेवून तिच्या लोकेशनची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरोडेखोर नवरीचे नेमके ठिकाण पोलिसांना मिळताच तिला अटक करण्यात येईल. दुसरीकडे, प्रीतीच्या पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.