हॉलिवूड अभिनेता विल स्मिथवर 10 वर्षे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बंदी घालण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि प्रोजेक्टर क्रिस रॉकला कानशिलात मारल्या प्रकरणी विलवर ही बंदी घालण्यात आली आहे.
हॉलीवूड फिल्म अकादमीने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “ऑस्करच्या मंचावर प्रोजेक्टर ख्रिस रॉकला कानशिलात मारल्यानंतर बोर्ड ऑफ गव्हर्नरने विल स्मिथला ऑस्करसह त्याच्या कोणत्याही कार्यक्रमांवर 10 वर्षांसाठी बंदी घातली आहे.
मुख्य कार्यकारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. विल स्मिथने ऑस्कर 2022 च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला कानशिलात मारली होती.
ख्रिसने स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली होती. ख्रिसने स्मिथची पत्नी जेडाच्या आजारपणावर आणि तिचे टक्कल पडण्यावर जोक केला होता जो पती स्मिथला आवडला नाही, आणि त्याने सर्वांसमोर स्टेजवर जाऊन ख्रिसला कानशिलात मारली.
याप्रकरणी स्मिथला दोषी मानत त्याच्यावर कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
एवढेच नाही तर विल स्मिथचा आगामी चित्रपट फास्ट अँड लूज प्रदर्शित होणार नसल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.