मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky kaushal) यांची जोडी इंडस्ट्रीतील आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर विकी आणि कतरिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 6 महिन्यांपूर्वी दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच कतरिना प्रेग्नंट असून लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

गेल्या महिन्यात कतरिना मुंबई विमानतळावर लूज-फिटिंग कपड्यांमध्ये दिसली तेव्हा पासून ही अफवा सुरु झाली. तिला सैल कपड्यात पाहून लोकांचा अंदाज आला की ती गर्भवती आहे. यानंतर नुकताच कतरिना कैफ दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा अहवाल समोर आला आहे. मात्र, आता विकी कौशलच्या प्रवक्त्याकडून एक नवीन गोष्ट समोर आली आहे.

आता पती विकी कौशलने कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या वृत्तावर मौन सोडले आहे. त्यांनी या सर्व गोष्टी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना विकी कौशलच्या टीमने गरोदरपणाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘हा अहवाल खोटा आहे. ही अफवा असून त्यात तथ्य नाही.

लग्नानंतर लगेचच विकी कौशल आणि कतरिना कैफने त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात केली. कतरिनाने नुकतेच ‘टायगर 3’चे शूटिंग पूर्ण केले. यानंतर ती तिच्या नवीन चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या कतरिनाकडे ‘जी ले जरा’, ‘फोन भूत’, ‘टायगर 3’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ सारखे चित्रपट आहेत.

वर्क फ्रंटवर, विकी कौशल लवकरच ‘सॅम बहादूर’ आणि ‘द अमर अश्वत्थामा’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.