बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौलीचा आरआरआर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक यांच्यात काही मतभेद असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या.

आरआरआर या चित्रपटातील तिच्या सीन्सवर कात्री चालवल्यामुळे आलीय नाराज असल्याचं म्हंटल जात होत. आणि तिने त्या चित्रपटासंबंधित पोस्ट देखील हटवल्या आहेत. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी त्यांनी एक निवेदन जारी केले होते.

दरम्यान, आता नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे आलिया भट्टने तिच्या पुढच्या चित्रपटासाठी एसएस राजामौलीसोबत हातमिळवणी केली आहे.आलिया या चित्रपटात महेश बाबूसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ही माहिती साऊथचे चित्रपट समीक्षक आणि ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.

उमेरच्या ट्विटरनुसार, सुपरस्टार आलिया भट्ट एसएस राजामौली यांच्या पुढील चित्रपटात सुपरस्टार महेश बाबूसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ज्याचे शूटिंग एप्रिल 2023 मध्ये सुरू होणार आहे. अलीकडेच राजामौली यांनी महेश बाबूसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पण चित्रपटात कोणती अभिनेत्री असणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *