गरोदरपणात शरीरात अनेक बदल होत असतात. यावेळी चक्कर येणे, उलट्या होणे या गोष्टी होत असतात. त्यामुळे तोंडात कडवटपणाही येतो. अशावेळी महिलांनी काहीही खाल्ले तरी त्याची चव समजत नाही.

गर्भधारणेवेळी चव न समजणे, तोंडात कडवटपणा येणे याला डिस्कगेशिया असे म्हणतात. म्हणून आज आम्ही गरोदरपणात होणार्‍या डिस्कगेशिया संबंधित काही महत्त्वाची माहिती सांगत आहोत. जाणून घेऊया –

अशा वेळी गर्भवती महिलांच्या तोंडाची चव खारट, धातूसारखी व करपलेल्या पदार्थासारखी होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात महिलांच्या तोंडाची चव अनेकदा बदलते, त्यामुळे त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

पहिल्या तीन महिन्यात तोंडाला चव कडू होते आणि काहीही खाताना चव येत नाही. काही महिलांना सुवासाऐवजी अन्नाचा वास येऊ लागतो. तसेच काही लोकांच्या वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की पहिल्या तीन महिन्यांनंतर ही स्थिती स्वतःहून बरी होते.

डिस्कगेशियाची कारणे

डॉक्टरांच्या माहितीनुसार काही लोकांच्या इस्ट्रोजेनची पातळी गरोदरपणात बदलते. हा हार्मोन टेस्ट बड्सवर परिणाम करतो, ज्यामुळे तोंडाची चव खराब होते.

याशिवाय अशी काही औषधे आहेत जी गरोदरपणात घेतल्यास तोंडाची चव बदलते. डॉक्टरांच्या मते, गरोदरपणात कमी पाणी प्यायल्याने तोंडाची चवही बदलते. मात्र, ही समस्या टाळण्यासाठी महिलांनी या उपायांचा अवलंब करावा.

द्रव पदार्थ घ्या

गरोदरपणात तोंडाची चव सुधारण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे. कारण, तोंडाची चव बिघडल्याने महिलांनी काहीही खाल्ले नाही, तर त्याचा परिणाम न जन्मलेल्या बाळावरही होतो. अशा परिस्थितीत महिलांनी पाणी आणि ज्यूस इत्यादी द्रवपदार्थांचे अधिकाधिक सेवन करणे गरजेचे आहे.

आंबट फळे खा

गरोदरपणात महिलांना आंबट पदार्थ खूप आवडतात. अशा परिस्थितीत तोंडाची चव सुधारण्यासाठी तुम्ही संत्री, लिंबू, कच्चा आंबा इत्यादींचे सेवन करू शकता. आंबट पदार्थ खाल्ल्याने तोंडात लाळ तयार होते आणि कडूपणा दूर होतो.

 

Leave a comment

Your email address will not be published.