हल्ली प्रत्येकजण आकर्षक व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी त्वचेपासून ते शरीरयष्टीपर्यंत आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतात. कारण यामुळे आपल्या व्यक्तिमत्वासोबतच वैयक्तिक आयुष्यदेखील प्रभावी बनते. याबाबतीत प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. यासाठी महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही ग्रूमिंग करणे खूप महत्वाचे आहे.

यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ग्रुमिंगच्या पद्धती सांगणार आहे. याने तुम्हाला परफेक्ट लूक मिळण्यास मदत होईल. तसेच याने तुम्ही आकर्षक व सुंदर दिसाल. चला तर मग जाणून घेऊ पुरुषांसाठी ग्रूमिंग का महत्वाचे आहे व ते कोणत्या पद्धतीने करणे फायदेशीर आहे.

पुरुषांसाठी ग्रूमिंग का आवश्यक आहे?

एखाद्या व्यक्तीचे विचार आणि त्याचे शब्द हे त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे सांगत असले तरी त्याचवेळी सुंदर दिसण्यासाठी ग्रूमिंगही आवश्यक असते. आंघोळ केल्यावर काही काळ ताजेतवाने दिसतात, पण काही वेळाने थकवा, घाम येणे इत्यादींमुळे चेहरा निस्तेज होतो. अशा परिस्थितीत, काही ग्रूमिंग पद्धतींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळ ताजेतवाने वाटेल व याने तुमचे व्यक्तिमत्व सतत प्रभावी दिसेल.

संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करा – ग्रूमिंगचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त तुमच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करा. चेहऱ्यासोबतच संपूर्ण शरीराकडेही लक्ष दिले पाहिजे. केसांपासून ते नखांपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

दाढीवरही लक्ष द्या – जर तुम्ही दाढी ठेवत असाल तर तिची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. अस्वच्छ दिसण्यासाठी तुम्ही दाढी नियमित धुवा, ट्रिमिंग करा आणि दाढीला तेल लावा.

त्वचेला मॉइश्चरायझ करा – हे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही महत्त्वाचे आहे. चेहरा धुतल्यानंतर कोरडेपणाची समस्या असते, त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. त्वचेला मॉइश्चर देण्यासोबतच ते ग्लोही देते.

नखांचीही घ्या विशेष काळजी – जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डेटवर जात असाल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आपले नखे योग्यरित्या कापून घ्या आणि आकार द्या.

बॉडी परफ्यूम – कधी कधी तुमच्या परफ्यूमचा सुगंध कुणाच्या तरी हृदयात आणि मनात घर करून जातो. चांगला वास देणारा परफ्यूम असणं खूप गरजेचं आहे. कोणतेही कठोर परफ्यूम वापरणे आवश्यक नाही, हलका परफ्यूम लावूनच बाहेर जा.

Leave a comment

Your email address will not be published.