नवरात्रीमध्ये देवीच्या ९ रूपांची पूजा ९ दिवस केली जाते. दरम्यान आपण ९ दिवसांचा उपवास करतो. यंदा 2 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू झाला आहे. अशावेळी तुम्ही ९ दिवस उपवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी, अन्यथा आपले शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते.
नवरात्रीच्या दरम्यान उपवास करताना उपाशीपोटी काय खावे व काय खाऊ नये अशा गोष्टी सांगणार आहोत या गोष्टींची विशेष विशेष काळजी घ्यावी.कोणते पदार्थ खाऊ नयेत याविषयी सांगणार आहोत.
उपाशीपोटी हे पदार्थ खाऊ नये.
दूध
उपाशीपोटी पोटी दूध आणि दही सेवन करणे चांगले. परंतु उपवासाच्या वेळी रिकाम्या पोटी दूध आणि दही खाऊ नका. यामुळे शरीरातील ऍसिडची पातळी वाढू शकते. तसेच, असे केल्याने आतड्यांतील एन्झाईम्सवर परिणाम होऊ शकतो.
तळलेले पदार्थ
बऱ्याचदा लोक उपवासात तळलेले पदार्थ खातात. अशा परिस्थितीत उपवासाच्या वेळी या गोष्टींचे सेवन करू नका. उकडलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे आरोग्य चांगले राहील.
कच्च्या भाज्या
उपवासादरम्यान उपाशीपोटी कच्च्या भाज्या खाणे टाळा. आम्ही तुम्हाला सांगतो की कच्च्या भाज्यांमध्ये फायबर असते. अशा स्थितीत सकाळी कच्च्या भाज्या खाल्ल्यास पोट फुगणे, पोटदुखी आदी समस्या उद्भवू शकतात.
केळी
केळी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण उपवास करताना रिकाम्या पोटी केळी खाणे टाळा. कारण आम्लयुक्त पदार्थांमध्ये केळीची गणना होते. अशा स्थितीत याच्या सेवनामुळे छातीत दुखणे, जळजळ होणे किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.