रात्रीची पुरेशी झोप ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची मानली जाते. रात्रीची झोप व्यवस्थित न झाल्यास याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासोबतच आपण आपल्या झोपण्याच्या पोझिशन मुळेही आपण आपले आरोग्य तणावपूर्ण बनवतो. काहीवेळा लोकांच्या आजाराच्या समस्येने देखील पुरेशी झोप होत नाही यामुळे ते चिडचिडे होतात.

जसे की पाठदुखी, मानदुखी आणि आम्लपित्त यामुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही. ते दूर करण्यासाठी काही वैज्ञानिक पद्धतींनेही त्यावर मात करता येते. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या आजाराच्या समस्या असताना, कोणत्या स्थितीत झोपणे फायदेशीर ठरते.

मानेत दुखणे

ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे, त्यांनी पोटावर झोपणे टाळावे. अशा लोकांनी त्यांच्या पाठीवर किंवा बाजूला झोपावे. तसेच, मानेखाली उशी ठेवण्यास विसरू नका.

पाठदुखी

पाठदुखीमुळे रात्री झोपेचा त्रास होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपावे लागेल, परंतु गुडघ्याखाली उशी ठेवून झोपावे लागेल. तज्ज्ञांच्या मते, यामुळे मणक्याचे नैसर्गिक वक्र कायम राहते. जर तुम्हाला जास्त विश्रांती हवी असेल तर टॉवेलचा रोल करा आणि तो तुमच्या कमरेखाली ठेवा आणि थोडा वेळ सरळ झोपा.

अॅसिडिटी दरम्यान

बाहेरचे तळलेले-भाजलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ लागते. रात्री अ‍ॅसिडिटी सुरू झाली तर रात्रभर झोप येऊ देत नाही. यापासून सुटका मिळवण्यासाठी झोपताना डोक्याखाली उंच उशी ठेवा किंवा पलंगाचे डोके काही प्रकारे वर करून त्याच्या बाजूला झोपा. ही पद्धत आराम देऊ शकते.

खांदा दुखणे

खांद्याच्या दुखण्यामुळे तुमची झोपतही व्यत्यय येऊ शकते. ज्या बाजूला खांद्यामध्ये दुखत असेल त्या बाजूला झोपू नका, कारण या पद्धतीमुळे वेदना आणखी वाढू शकतात. पाठीवर झोपण्याची सवय लावा. तर अशी उशी वापरा, ज्यामुळे शरीराला आराम वाटेल.

Leave a comment

Your email address will not be published.