महाअपडेट टीम, 24 जानेवारी 2022 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका चुकीमुळे चाहते आणि टीकाकार नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर टीकाकारांनी बीसीसीआयकडे (BCCI) विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.

झालं असं की, केपटाऊनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत सुरु होतं. यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले जे ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र, यावेळी विराटकोहली च्युइंगम (Chewing Gum) चघळताना दिसला.

कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलमधून घेतलेल्या शॉटमध्ये विराट दोनदा च्युइंगम खाताना दिसला. लोकांना विराटचे हे लाजिरवाणं कृत्य आवडले नाही आणि तो पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागला.

विराटच्या (Virat Kohli Viral Video) या कृत्याचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर आता चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

विराटने राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं सांगत अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. या कारणावरुन ट्रोल होण्याची विराटची ही पहिली वेळ नाही. याआधीही 2017 साली श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरू असताना विराट च्युईंगगम खाताना दिसला होता.

Leave a comment

Your email address will not be published.