नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid afridi) दावा केला आहे की, जागतिक क्रिकेटवर भारताचा मोठा प्रभाव आहे. कारण हा देश खेळातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल आणि त्याच्या अडीच महिन्यांच्या विंडोबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला, त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा पाकिस्तानच्या FTP कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही.

माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, भारताचे इतके वर्चस्व आहे की ते लीगसाठी इतका मोठा वेळ काढू शकतात. खेळाडू म्हणाला की, बाजार आणि अर्थव्यवस्थेपुढे सर्व काही झुकते, भारत ही सध्या क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि तो जे काही बोलेल ते होईल. आफ्रिदी म्हणाला, हे सर्व बाजार आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. भारत ही क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि ते जे म्हणतील ते होईल.

गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते की पुढील पाच वर्षांसाठी आयपीएल मीडिया हक्क सुमारे $6.2 अब्जांना विकले गेले. यामुळे आयपीएल ही जागतिक क्रीडा प्रकारातील सर्वात श्रीमंत लीग बनली आहे. डिस्ने स्टारने 23,575 कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले. तर Viacom 18 ने त्याच प्रदेशाचे डिजिटल अधिकार सुरक्षित केले. Viacom18 ने 23,758 कोटी रुपयांना तीन जागतिक क्षेत्रांसाठी (ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड) प्रसारण हक्क विकत घेतले.

नवीन सायकलचा एकूण करार मागील करार (2018-22) पेक्षा 2.96 पट जास्त आहे, जो त्यावेळी सुमारे 16,347 कोटी रुपये होता. मागील चक्रात प्रति हंगाम 60 सामने खेळले जात होते. मात्र, पुढील वर्षी सुरू होणाऱ्या नव्या चक्रात आयपीएलने प्रत्येक मोसमातील सामन्यांची संख्या बदलली आहे. 2023 आणि 24 हंगामात 74 सामने खेळवले जातील. त्यानंतर 2025 आणि 26 हंगामात 84 सामने खेळवले जातील. कराराच्या शेवटच्या वर्षात 94 सामने खेळले जातील.

दरम्यान, पीसीबीच्या सूत्रानुसार आयसीसीच्या एफटीपी कॅलेंडरमध्ये आयपीएलला मोठी विंडो असेल अशी शाह यांच्या घोषणेनंतर पाकिस्तान बोर्ड आता इतर बोर्डांशी बोलणार असल्याचे म्हटले होते. कारण याचा आंतराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होईल आणि आता यावरच माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.