पावसाळ्यात अंधार पडताच डास आपल्या अवतीभोवती घोंगत असतात. त्यात पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने व अस्वच्छतेमुळे जीवघेण्या डासांची उत्पत्ती होत असते. यांना दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील केले जातात. पण तरीदेखील पाहिजे असा फायदा होता नाही.

जर डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हीही अनेक उपाय करून थकला असाल तर, फोनमधील एका अॅपच्या मदतीने डासांच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

अॅप्समुळे डासांपासून सुटका होईल

होय, अॅपद्वारे तुम्ही डासांपासून मुक्ती मिळवू शकता. Google Play Store आणि Apple Play Store वर डासांना दूर करण्यासाठी एक अॅप उपलब्ध आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता. अॅप वापरून डास नाहीसे होतात, असा दावा या अॅप्सच्या डेव्हलपरने केला आहे.

अल्ट्रासोनिक आवाजापासून डास दूर पळतात

सर्व मॉस्किटो रिपेलेंट अॅप्सची पद्धत जवळपास सारखीच आहे. हे सर्व कमी वारंवारता आवाज निर्माण करून डासांपासून मुक्त होण्यास मदत करतात. डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कमी वारंवारता अल्ट्रासोनिक आवाज निवडू शकता. असा दावा केला जातो की अल्ट्रासोनिक साउंड फ्रिक्वेन्सीचा आवाज खूप कमी असतो जो माणूस ऐकू शकत नाही.

अॅप किती गोष्टी करू शकतो

या मॉस्किटो रिपेलेंट अॅपबद्दल जाणून घेतल्यानंतर आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील की हे अॅप कसे आहे? ते वापरणे योग्य आहे की नाही? आमच्या मतावर विश्वास ठेवला तर हे मॉस्किटो रिपेलेंट अॅप काही खास नाही. याबाबत युजर्सकडून चांगला प्रतिसाद नाही. इतकेच नाही तर अनेक युजर्स यातून आवाज येत असल्याच्या तक्रारीही करत आहेत. असेही म्हटले जात आहे की अॅप्सवर खूप जाहिराती दाखवल्या जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांना खूप त्रास होतो.