आजकाल वाढत्या वजनाच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. यासाठी तर्हे तर्हेचे उपाय करत असतात. बहुतेकजण वजन कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देतात. तर काहीजण यासाठी डाएटवर राहतात. पण तरीही वजन कमी होत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला एक नवीन आणि वेगळाच उपाय सांगत आहोत.

प्रसिद्ध आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी फक्त खाणेच नाही तर पाणी पिण्याकडंही लक्ष दिले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया दररोज किती ग्लास पाणी पिल्याने तुमचे वजन कमी होईल.

वजन कमी करण्यासाठी किती ग्लास पाणी प्यावे?

रोज ७-८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पाणी पीत असाल तर पुरुषांनी 15.5 कप आणि महिलांनी 11.5 कप पाणी प्यावे. त्यांनी पुढे सांगितले की तुम्ही तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष द्या, जेणेकरून आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणे टाळता येईल. जर तुमच्या लघवीचा रंग पांढरा होत असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे कमी करा.

वजन कमी करण्यात पाणी कशी मदत करते?

अनेक अभ्यास सांगतात की वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुरेसे पाणी पिणे. कारण, ते तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. त्याचबरोबर जेवण्यापूर्वी लगेच पाणी प्यावे, जेणेकरून शरीराला जास्त अन्न मिळणार नाही. कारण, डिहायड्रेशनमुळे वाटणारी तहान लोक भूक म्हणून घेतात आणि अशा स्थितीत जास्त खातात असे अनेकदा दिसून आले आहे.

पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

आपल्या एकूण आरोग्यासाठी पिण्याचे पाणी खूप महत्वाचे आहे. कारण ते पचनसंस्थेद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि सूज येणे सारख्या समस्या देखील दूर होतात.