मलेरिया हा रोग बहुतेकदा एनॉफिलीस नावाच्या मादी डास चावल्याने होतो. यामुळे व्यक्तीला ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे, कंटाळवाणेपणा, थकवा, अस्वस्थ वाटणे, याचा त्रास मोठ्याप्रमाणात जाणवतो. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मलेरिया रुग्णाने उपचारादरम्यान विशिष्ट आहार घेणे गरजेचे असते.

यासाठी आज आम्ही तुम्हाला मलेरिया रुग्णाने आहारात काय खावे आणि काय टाळावे याविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ मलेरिया रुग्णांसाठी योग्य आहार कोणता व मलेरिया रुग्णाने कोणता आहार टाळावा याविषयी.

मलेरियामध्ये काय खावे

संतुलित आहार आवश्यक आहे

तज्ज्ञांच्या मते मलेरियामध्ये तुमचा आहार जितका अधिक पौष्टिक आणि निरोगी असेल तितकी मलेरियापासून बरे होण्याची शक्यता जास्त असते. आहारात रुग्णाला संतुलित आहार द्यावा. समतोल आहारात धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे, द्रवपदार्थ द्या. हे सर्व आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, तसेच शरीरातील द्रव संतुलन राखतात.

रुग्णाला हायड्रेटेड ठेवा

रुग्णाला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. नारळपाणी, लिंबूपाणी, ताक, लस्सी, सूप, मसूर सूप, सफरचंदाचा रस, इलेक्टोरल वॉटर इत्यादी द्रवपदार्थ भरपूर प्या.

निरोगी प्रथिने जोडा

मलेरियाने त्रस्त असलेल्या रुग्णाला प्रथिनयुक्त आरोग्यदायी गोष्टी पुरेशा प्रमाणात खायला द्या. यामध्ये हलकी कडधान्ये, चिकन आणि फिश स्टू, चिकन सूप, स्किम्ड मिल्क आणि त्यातील उत्पादने खायला द्या.

लिंबूवर्गीय फळे खा

फळे खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, यासाठी लिंबू, संत्री, द्राक्ष, किवी इत्यादी लिंबूवर्गीय फळे खायला द्या.

कमी फायबरयुक्त पदार्थ खा

सुरुवातीच्या टप्प्यात कमी फायबरयुक्त आहारात खिचडी, मऊ मूग डाळ, उकडलेला मऊ तांदूळ, दलिया इत्यादींचा समावेश करावा.

मलेरियामध्ये काय खाऊ नये

तज्ज्ञांच्या मते मलेरिया रुग्णाने फायबर युक्त आहार, तळलेले पदार्थ टाळावेत, कारण त्यामुळे मळमळ, उलट्या आणि जठरासंबंधी समस्या होऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ जसे की कॅन केलेला आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे अजिबात टाळा.

रुग्णाला फक्त घरी शिजवलेले अन्न द्यावे. अन्न बनवताना जास्त तेल आणि मसाल्यांचा वापर टाळा. मलेरिया झाल्यास कधी आणि किती प्रमाणात आहार द्यावा याबद्दल आपण डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. आहारात या गोष्टींचे योग्य पालन केल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. त्याची शारीरिक दुर्बलताही दूर होऊ शकते.

Leave a comment

Your email address will not be published.