आपण नेहमी आजूबाजूला लोकांना व्यायाम करताना पाहत असतो. यात काहीजण स्वास्थ्य नीट राहण्यासाठी तर काहीजण लठ्ठपणा व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करतात.

पण अनेकांना वाटते चुकीच्या आहार पद्धतीमुळे चरबी वाढते. मात्र असे म्हणणे चुकीचे आहे, चरबी वाढण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यासाठी जाणून घ्या कोणत्या सवयींमुळे पोटाची चरबी वाढते.

नीट झोप न झाल्यास पोटाची चरबी वाढते

आरोग्य तज्ञ सहमत आहेत की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहार आणि व्यायाम समाविष्ट करणे आवश्यक आहे.

एका संशोधनानुसार, केवळ खराब आहार आणि व्यायामाचा अभाव हे लठ्ठपणाची कारणे नसून झोपेची कमतरता हे देखील त्यामागे एक मोठे कारण आहे. जर तुम्ही वेळेवर झोपलो नाही तर तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. चांगली झोप न घेण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाची चरबी वाढू लागते.

तुम्ही दररोज किती तास झोपले पाहिजे

चांगल्या आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की दिवसाच्या कोणत्याही वेळी झोपणे योग्य आहे. जे लोक रात्री उशिरा झोपतात किंवा कमी झोप घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.

रात्री १० वाजता झोपल्यास लठ्ठपणाचा धोका कमी असतो. एकंदरीत, तुम्हाला चांगली झोप घेण्यासोबतच रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी लागेल, जेणेकरून तुमचा लठ्ठपणा वाढणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published.