अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना मनात राज्य करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी आज यशाच्या उंच शिखरावर पोहचला आहे. त्याच्याकडे आता करोडो ची संपत्ती आहे.
मात्र, अचानक काय झाले काय माहित? की नवाजुद्दीन एवढ्या महागाच्या गाड्या सोडून लोकल ने प्रवास करताना दिसला आहे. यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण त्याच्या एका चाहत्याने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक व्यक्ती येतो, स्टेशनवर उभा राहतो आणि ट्रेन आल्यावर लोकल प्रवास करतो. पण या प्रवासात त्याला कोणीही ओळखत नाही आणि अखेर एक चाहता त्या व्यक्तीला ओळखतो आणि त्याचा व्हिडिओ काढून शेअर करतो. या व्हिडिओतिल व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीन सिद्दीकी मीरा रोड येथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. मात्र त्यानंतर त्याला लगेचच आणखी एका इव्हेंटसाठी जायचे होते. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्याने स्वतःची गाडी न वापरता लोकलने प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.