Weather Update : महाराष्ट्रात तापमानाचा पारा अजूनही कमी झालेला नाही याची सर्वात जास्त झळ विदर्भवासीयांना (Viadrbha) बसत आहे. विदर्भात अजूनही तापमानात मोठी वाढ आहे.

यामुळे तेथील जनतेला चटक्यांपासून फारसा दिलासा मिळालेला नाही. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात तापमानात वाढ बघायला मिळाली. मित्रांनो आता हाती आलेल्या माहितीनुसार, आज पासून अर्थात रविवारपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे.

मात्र, असे असले तरी लवकरच विदर्भ वासियांना दिलासा मिळणार आहे कारण की 12 तारखे नंतर विदर्भातील प्रमुख जिल्हा नागपूरसह (Nagpur) विदर्भातील अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज (Rainfall forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या विदर्भास यामुळे दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, शुक्रवारी आणि शनिवारी चंद्रपुरात तापमान 45 अंशच्या आसपास होते. त्याखालोखाल वर्धा, यवतमाळ, ब्रह्मपुरी या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय नागपुरात देखील 43 अंश सेल्शिअसच्या दरम्यान तापमान असल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

भारतीय हवामान विभागानुसार आज रविवार अर्थात 8 मे ते मंगळवार 10 मे यादरम्यान अकोला, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या सौम्य लाट दस्तक देणार आहे.

मात्र, सध्याचे तापमान बघता 8 ते 10 मे या काळात विदर्भातील या जिल्ह्यातील तापमान 45 अंशांच्या आसपास तसेच चंद्रपूर, अकोला व ब्रह्मपुरी येथील तापमान 46 अंशांपेक्षा देखील अधिक असू शकते.

10 तारखेनंतर मात्र वातावरणात बदल (Climate Change) होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली असल्याने विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात (In the Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. यामुळे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरुवारी अर्थात 12 तारखेपासून ते 18 मे अर्थात बुधवारपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता आहे.

या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात सर्व जिल्ह्यांमधील तापमान हे सरासरी असेल किंवा त्यापेक्षाही कमी राहणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे निश्चितच 12 तारखेपासून विदर्भातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.