गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र तापमानाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. विशेषता मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbh) उष्णता अधिक जाणवत असून उष्णतेची लाट नागरिकांसाठी मोठी त्रासदायक सिद्ध होत आहे.

दरम्यान नुकत्याच काही दिवसापूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Untimely Rain) देखील हजेरी लावली होती त्या ठिकाणी तापमानात थोडी घटही झाली.

आज शुक्रवारी महाराष्ट्राच्या बहुतांश (Maharashtra Weather) भागात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. मात्र असे असले तरी, पुढील काही दिवस आकाशात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर तर काही दिवस वातावरण साफ राहील एकंदरीत ढगाची ये-जा सुरूच राहणार आहे.

दरम्यान, राज्यातील तापमान सरासरीपेक्षा कमी किंवा जवळपास नोंदवले जात आहे. दुसरीकडे, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या विविध भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

6 ते 9 मे दरम्यान नागपूरसह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम श्रेणीत नोंदवला जात आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामानाचा काय असेल अंदाज. कुठे सुरु राहणार उष्णतेची लाट आणि कुठं असणार हवामान सामान्य.

राजधानी मुंबई – आज शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय हवामान स्वच्छ राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

पुणे- मित्रांनो पुण्यात जास्तीत जास्त तापमान 40 अंश सेल्सिअस राहणार आहे आणि कमीत कमी तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मुंबईप्रमाणेच पुणे येथे देखील हवामान स्वच्छ राहणार असे सांगितले गेले आहे.

नागपूर- विदर्भातील नागपुरात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय नागपूर मध्ये थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.

नाशिक- पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जास्तीत जास्त तापमान 37 अंश सेल्सिअस आणि कमीत कमी तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यात देखील पुणे आणि मुंबई प्रमाणेच हवामान स्वच्छ राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद- मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये जास्तीत जास्त तापमान तापमान 41 अंश सेल्सिअस राहणार असून कमीत कमी तापमान हे 25 अंश सेल्सिअस राहण्याचा भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये देखील आकाश निरभ्र राहणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.