Weather Update :-संपूर्ण राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. विशेषता विदर्भ आणि मराठवाडा (Marathwada) तापमानामुळे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

असे असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा (Untimely Rain) इशारा देण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल पर्यंत राज्यातील काही भागात तसेच गोवा (Goa) राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

या पावसामुळे तापमानाने हैराण झालेल्या जनतेस दिलासा मिळतो की नाही हे विशेष पाहण्यासारखे राहील. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागात पावसाची हजेरी बघायला मिळू शकते याशिवाय गोव्यामध्ये देखील पावसाचे आगमन होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे या भागात पाऊस आणि वादळी वाऱ्याचे (Stormy Winds) थैमान बघायला मिळू शकते. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात जास्तीत जास्त तापमानात वाढ नमूद करण्यात आली आहे.

या शिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात देखील तापमानात थोडी वाढ झाली आहे. यामुळेच आगामी काही दिवसात राज्यात तसेच गोव्यात अवकाळी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, उद्यापासून अर्थात 21 एप्रिल पासून ते 23 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. यादरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी वारे बघायला मिळू शकतात.

राज्यातील काही भागात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच काही ठिकाणी विजेचा कडकडाट कायम राहणार आहे. याबाबत हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी माहिती सार्वजनिक केली आहे.

कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस:
•21 आणि 22 तारखेला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात अवकाळीचा त्राहिमाम बघायला मिळू शकतो. तसेच या दोन दिवशी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात पावसाच्या सर्‍या बसण्याची शक्यता वरिष्ठ शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

•23 तारखेला देखील अवकाळीची हजेरी राज्यात राहणार आहे. या तारखेला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात 23 तारखेला पावसाची हजेरी बघायला मिळू शकते असा हवामान विभागातील एका वरिष्ठ शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

Leave a comment

Your email address will not be published.