Weather Forecast : महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेसाठी भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) एक दिलासा देणारी बातमी सार्वजनिक केली आहे.

आजपासून येत्या तीन ते चार दिवसासाठी महाराष्ट्रात तापमानात घट (Maharashtra Weather Update) होणार असून जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात राजधानी मुंबईसह (Mumbai Weather Forecast) विविध ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईसमवेत राज्यातील विविध भागात यामुळे तापमानात घट होणार आहे. ढगाळ वातावरण असले तरी देखील पावसाची शक्यता कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेत घट होईल.

यामुळे निश्चितच जनतेला थोडासा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो खरं पाहता, गेल्या काही दिवसांपासून राज्यात संमिश्र वातावरण आहे. 8 आणि 9 मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता होती.

मात्र सध्या उष्णतेच्या लाटेबाबत कोणताही इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला नाही. यामुळे निश्चितच विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जनतेसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील काही महत्त्वाच्या शहराचा आजचा अर्थात 10 मेचा हवामान अंदाज.

राजधानी मुंबईचा आजचा हवामान अंदाज
मित्रांनो आज 10 मे अर्थात मंगळवारी राजधानी मुंबईत (Mumbai Weather) जास्तीत जास्त तापमान 33 आणि कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज राजधानी मुंबई ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना मुंबई वासियांना उकाड्यापासून आराम मिळणार आहे.

पुण्याचा आजचा हवामान अंदाज
आज 10 मे रोजी पुण्यात (Pune Weather) जास्तीत जास्त तापमान 40 आणि कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे राजधानी मुंबईप्रमाणेच पुण्यातही अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे निश्चितच मुंबईकरांप्रमाणेच पुणेकरांना देखील उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

नागपूरचा आजचा हवामान अंदाज
विदर्भातील प्रमुख शहर नागपुरात (Nagpur Weather) जास्तीत जास्त तापमान 44 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

विशेष म्हणजे पुणे-मुंबई प्रमाणेचं विदर्भातील या शहरातही हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

वाईन सिटी नाशिकचा आजचा हवामान अंदाज
नाशिकमध्ये (Nashik Weather) आज 10 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 38 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर नाशिकमध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार असा अंदाज वर्तवला आहे.

औरंगाबादचा आजचा हवामान अंदाज
मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये (Aurangabad Weather) आज 10 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 39 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इतर शहरांप्रमाणेच औरंगाबाद मध्ये देखील आज ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.