आजकाल घरबसल्या अनेकांचे वजन वाढते व त्यासोबतच पोटाची चरबीही वाढत असते. परंतु बरेच लोक असेही आहेत की जे कमी वजन व तब्येत वाढत नसल्याने त्रस्त असतात. हे लोक वजन वाढीसाठी बऱ्याचदा वेगवेगळी सप्लिमेंट्स, महागड्या पावडरचा वापर करून वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

पण याने तेवढा फरक पडत नाही. व ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तर आज आम्ही तुमची वजन वाढवण्यासाठीची चिंता दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय म्हणून ४ वेगवगळ्या फळांचा ज्यूस सांगणार आहोत. ज्याने तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. ते जाणून घ्या.

१. केळीचा रस- केळी वजन वाढवण्यास खूप मदत करते. दुबळ्या लोकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही केळी दुधासोबत खाल्ल्यास काही दिवसात तुमच्या शरीरात फरक दिसू लागेल. केळीचा शेक रोज प्या. दूध आणि केळी घालून बनवलेला शेक चवदार आणि आरोग्यदायी असतो. केळीमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि ते शरीराला भरपूर पोषण देतात.

२.आंब्याचा रस- आंब्याचा रस प्यायल्याने वजनही वाढते. तुम्ही मँगो शेक बनवून मँगो आणि दूध मिक्स करून पिऊ शकता. याशिवाय आंब्यामध्ये अननस मिसळून त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. या रसामुळे वजन झपाट्याने वाढते. आंबा आणि अननस ही दोन्ही उच्च कॅलरी फळे आहेत. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. वजन वाढवण्यासाठी हा रस जरूर वापरून पहा.

३.एवोकॅडो रस- वजन वाढवण्यासाठी एवोकॅडो हे उत्तम फळ आहे. याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे. जर तुम्ही रोज एवोकॅडोचा ज्यूस प्यायला तर काही दिवसात तुमचे वजन वाढू लागेल. एवोकॅडोमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि त्यात नैसर्गिक चरबी असते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

४.चिकूचा रस- चिकू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. विशेषत: ज्यांना वजन वाढवायचे आहे. चिकू हे खूप गोड आणि कॅलरी युक्त फळ आहे. वजन वाढवण्यासाठी तुम्ही दूध आणि चिकू मिक्स करून शेक करून प्या. चिकूमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन ए आढळतात.

Leave a comment

Your email address will not be published.