प्रथम फलंदाजी करताना RCB ने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध 181 धावा केल्या. यासामन्यात फाफ डू प्लेसिसने 96 धावांची शानदार खेळी केली. फॅफला वगळता आरसीबी संघाचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. मुख्य म्हणजे विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो पुन्हा गोल्डन डकचा बळी ठरला. या खेळीसह विराटने पुन्हा चाहत्यांची निराश केले. विराट कोहलीचा हा फॉर्म पाहता नेटकरी ट्विटरवर त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत.

एका नेटकऱ्याने ट्विट करत लिहिले, “कोहलीला वगळण्याची वेळ आली आहे. त्याने या मोसमात निराशा केली आहे” तर दुसऱ्या नेटकऱ्याने “कोहलीच्या खराब फॉर्मचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत…” तर एका चाहत्याने लिहिले, “कोहलीला पाहण्यासाठी दिवसभर वाट पाहा आणि शेवटी निराशा मिळावा”

कर्णधारपदाच्या ओझ्यामुळे कोहलीचा मागील काही काळापासून खेळ बिघडत होता, त्यामुळे त्याने मागील वर्षी आयपीएलच्या चालू हंगामातून कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याने भारताच्या तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्वही सोडले होते. अशा स्थितीत कोहलीवर कोणताही दबाव नसून तो मोकळेपणाने खेळून चाहत्यांचे पुन्हा मनोरंजन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, कोहलीने पुन्हा निराशा केली. त्यामुळे ट्विटरवर चाहते आता त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.