महाअपडेट टीम, 12 जानेवारी 2022 : केपटाऊन कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या 79 धावांच्या शानदार खेळीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या खेळीदरम्यान विराट कोहलीने कोणताही अहंकार दाखवला नाही आणि त्यामुळेच तो यशस्वी झाल्याचे गौतम गंभीर म्हणाला. चांगल्या चेंडूंला त्याने सन्मानही दिला.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात 79 धावांची शानदार खेळी केली होती. यादरम्यान त्याने 201 चेंडूंचा सामना केला आणि अनेक शानदार चौकार मारले. विराट कोहली पूर्णपणे आपल्या लयीत दिसत होता.

परंतु दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही फलंदाजाची साथ नसल्याने तो आपलं शतक पूर्ण करू शकला नाही आणि अधिक धावा करण्याच्या घाईत बाद झाला. मात्र, कोहलीच्या खेळीमुळेच टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

विराट कोहलीच्या या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत आणि आता या पर्वात गौतम गंभीरचे नावही जोडलं गेलं आहे. विराट कोहलीने कमकुवत चेंडूंची वाट पाहिली आणि चांगल्या चेंडूंचा आदर केला, असं गंभीरने म्हटलं आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान गौतम गंभीर म्हणाला, “विराट कोहलीने अनेकवेळा सांगितले आहे की, जेव्हा तुम्ही इंग्लंडला जाल तेव्हा भारतात तुमचा अहंकार सोडायला हवा. आज कोहलीने त्याचा इगो किट बॅगमध्ये ठेवला. आणि या खेळीमुळे मी खेळलेली मला त्याने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्वोत्तम खेळी आठवल्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *