नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने आशिया चषकापूर्वी एमएस धोनीबद्दल एक खास ट्विट केले आहे. ट्विट करत कोहली म्हणाला, एमएस धोनी सोबतची भागीदारी त्याच्यासाठी नेहमीच खास असेल.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर एमएस धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीने अनेक शानदार खेळी केल्या. त्याचवेळी एमएस धोनी कर्णधारपदापासून दूर गेल्याने विराट कोहलीला कर्णधारपद मिळाले. विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यात नेहमीच चांगली समजूत होती. कोहलीला आजही आपल्या माजी कर्णधाराबद्दल खूप आदर आहे.

एमएस धोनी आणि माझी भागीदारी नेहमीच खास असेल : विराट कोहली

आशिया कप सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने अचानक एमएस धोनीसाठी ट्विट केले. तो म्हणाला, “महेंद्रसिंग धोनीचा विश्वासू उपकर्णधार असणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आणि रोमांचक काळ होता. माझ्यासाठी आमची भागीदारी नेहमीच खास असेल. 7+18

सध्या भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. विराटसोबतच त्याचे चाहतेही त्याचा स्टार पुन्हा फॉर्ममध्ये येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विराट कोहली 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळणार आहे आणि त्याचवेळी त्याच्या फॉर्ममध्ये परतण्याची प्रतीक्षाही संपुष्टात येऊ शकते. विराट कोहली आता 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.

त्याचवेळी विराट कोहलीने आशिया चषकापूर्वी एमएस धोनीबद्दल अचानक जे ट्विट केले आहे, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे, कोहलीने अचानक हे ट्विट का केले. याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.