नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याची तयारी लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यासह सुरू केली. गुरुवारपासून सुरू असलेल्या या सराव सामन्यात काही भारतीय खेळाडू आपल्याच संघाविरुद्ध मैदानात उतरले.

या सामन्यात चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा विरोधी संघाकडून खेळत आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि भारताने 81 धावांत 5 विकेट गमावल्या.

या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. त्याचवेळी पहिल्या डावात अशी घटना घडली ज्याने क्रिकेट चाहत्यांना काही क्षणांसाठी थक्क केले. खरे तर, विरोधी संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला.

बुमराहचा एक अतिशय वेगवान चेंडू रोहित शर्माच्या कमरेला लागला आणि तो बराच वेळ क्रीजपासून दूर राहिला. काही वेळाने तो खेळू लागला. चेंडू लागल्यानंतर रोहित शर्माने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यावरून त्याला खूप दुखापत झाल्याचे दिसत होते.

या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माने निराशा केली आणि 25 धावांची इनिंग खेळल्यानंतर त्याने आपली विकेट गमावली. त्याचवेळी गिलनेही 21 धावांवर आपली विकेट गमावली. दुसरीकडे, हनुमा विहारी देखील 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर श्रेयसला अय्यरला खातेही उघडता आले नाही आणि त्याने 11 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला.

Leave a comment

Your email address will not be published.