नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल केवळ त्याच्या फलंदाजीसाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याचे आयुष्य जगण्याची पद्धत पाहून लोकांनाही भुरळ पडते. सध्या गेल लिजेंड्स लीगमधील गुजरात जायंट्स संघाचा भाग आहे. सेहवागच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत आणि सोमवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे.

मात्र त्याआधी गरबा नाईटमध्ये टीमचे सर्व खेळाडू खास पद्धतीने नवरात्र साजरे करताना दिसले. या रात्री, सेहवाग आणि ख्रिस गेलसह इतर सहकारी देखील शानदार कपड्यांमध्ये दिसले. त्याचवेळी ख्रिस गेलच्या नेत्रदीपक डान्सने सर्वांनाच थक्क केले. गुजरात जायंट्सने गेलच्या या फनी डान्सचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात ३० सप्टेंबरला सामना झाला होता. या सामन्यात युनिव्हर्स बॉसने 68 धावांची तुफानी इनिंग खेळली. पण पठाण ब्रदर्सने त्याचा डाव उद्ध्वस्त केला. दोन्ही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भिलवाडा किंग्जने हा सामना 5 गडी राखून जिंकून प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित केले.