मुंबई : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)हे बॉलिवूडचे सर्वांत क्युट कपल बनले आहेत. कतरिनाची फॅन फॉलोइंग किती जबरदस्त आहे, हे यावरूनच कळते की, तिने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि अवघ्या तासाभरात 13 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही त्यांच्या प्रोफेशनल कमिटमेंट्ससोबतच स्वतःसाठीही वेळ काढताना दिसतात. दोघेही अनेकदा त्यांच्या रोमँटिक क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

कतरिना कैफने शनिवारी सकाळी विकी कौशलसोबत स्विमिंग पूलमधला एक फोटो शेअर केला आहे. कतरिनाने स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचा फोटो शेअर करत ‘मैं और मेरा’ असे कॅप्शन लिहिले आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या या फोटोला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. हा फोटो शेअर होताच लाखो लोकांनी लाईक्सचा पाऊस पडला. त्याचवेळी चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्या फोटोवर प्रेम व्यक्त करत आहेत.

हृतिक रोशनने ‘खूप छान’ अशी कमेंट केली आहे तर रकुलप्रीत सिंगने हार्ट इमोजी शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. त्याचबरोबर चाहते या जोडीचे सुंदर आणि क्युट म्हणून कौतुक करत आहेत.

कामाबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहेत, तर विकी कौशल सारा अली खानसोबत ‘लुका छुपी 2’मध्ये दिसणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.