तुमच्या चेहऱ्याच्या काही भागांवर कडक उन्हामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा तेलकट व निस्तेज दिसू लागते. यासाठी मुली महागड्या क्रिम्सवर पैसे खर्च करतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला स्किनची काळजी कशा प्रकारे घ्यावी लागणार आहे. त्या बद्दल टिप्स सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला त्याचा फायदा मिळवता येऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती टिप्सबद्दल सांगणार आहोत. त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतील.
केळी आणि ऑरेंज फेस मास्क
एक केळीच्या रसात १ चमचा संत्र्याचा रस आणि थोडे मध मिसळा. १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा. या टीप्समुळे टॅनिंग तर दूर होईलच पण त्वचा कोरडीही होणार नाही.
दही आणि टरबूज
तुमच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेटेड, लवचिक आणि चमकदार बनवण्यासाठी लावू शकता. यासाठी टरबूजाचा रस दह्यात मिसळून चेहऱ्यावर आणि टॅनिंग भागावर लावा. १५ मिनिटांनंतर, मऊ ब्रशने स्क्रब करा आणि नंतर ताजे पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ह्या टिप्स लावल्याने तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील.
मिंट आणि मुलतानी माती
पुदीना त्वचेला शांत करण्यास मदत करते, तर मुलतानी माती अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. यासाठी पुदिन्याच्या पेस्टमध्ये मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळा. चेहरा, मान, कोपर यावर १५ मिनिटे लावल्यानंतर ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा.
काकडी आणि मध
काकडी आणि मधामध्ये मॉइश्चरायझिंग आणि कूलिंग एजंट असतात ज्यामुळे त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते. यासाठी १ काकडीच्या रसात १ चीमटभर मध मिसळा. संपूर्ण चेहऱ्यावर ३० मिनिटे लावल्यानंतर ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा. असे नियमित केल्याने टॅनिंग देखील दूर होईल आणि त्वचा देखील चमकदार होईल.
गुलाब पाणी आणि चंदन
चिमटभर चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिसळा आणि १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर ताज्या पाण्याने धुवा. यामुळे छिद्र आतून स्वच्छ होतील तसेच घाण आणि टॅनिंगही दूर होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फेसवॉशऐवजी ह्या टिप्स लावू शकता.