प्रत्येकालाच सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. पण आजकालच्या प्रदूषणामुळे केस लवकर खराब व निर्जीव होत असतात, तर केसांच्या अनेक समस्या देखील उद्भवत असतात. अशात केसांची काळजी घेणे वाटते तितके सोपे नाही.

बाजारात अनेक प्रकारचे हेअर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, पण त्यात अनेक प्रकारची केमिकल्स मिसळलेली असतात. ज्यामुळे केस खराब होतात. अशावेळी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. त्वचेसोबतच केसांसाठीही हे फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊ कसे ते.

केसांमधला कोंडा दूर करण्यासाठीही गुलाब पाण्याचे फायदे दिसून येतात. यासंबंधित संशोधनातून स्पष्टपणे माहिती मिळते की कोंडा नियंत्रित करण्यात गुलाब महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. गुलाबामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात.

ऑक्सिडेटिव्ह तणाव हे केस गळणे आणि केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी गुलाबपाणी फायदेशीर ठरू शकते.

केसांमध्ये गुलाबपाणी वापरल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. गुलाबपाणी वापरल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

केसांना गुलाबपाणी लावण्याचे फायदे हेअर मॉइश्चरायझर म्हणूनही बघता येतात. अशा परिस्थितीत, त्याचा वापर केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो.