सध्याचा काळात धूळ व प्रदूषणामुळे बरेचसे लोक चेहऱ्यावर येणारे डाग आणि सुरकुत्या यामुळे त्रस्त आहेत. काहींना तर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागल्या आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे म्हणजे वय जास्त झाल्यासारखे जाणवते.

डाग आणि सुरकुत्या यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब दिसते. ते घालवण्यासाठी बहुतेक लोक विविध प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करतात, ज्याचे कधीकधी दुष्परिणाम होतात. प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाचा वापर हा उत्तम पर्याय आहे.

बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात आणि तुम्ही नेहमी तरूण आणि सुंदरही दिसता. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने कोणते फायदे होतात.

आईस मसाजमुळे चेहऱ्यावर चमक येते

चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर बर्फाने चेहऱ्याला मसाज करा. चेहऱ्यावर बर्फ मसाज करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फाचा क्यूब गुंडाळा आणि दोन ते तीन मिनिटांनी चेहऱ्याला मसाज करा. रोज चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने घामावर नियंत्रण येते आणि चेहरा उजळतो.

बर्फाच्या मसाजमुळे मुरुमे दूर होतात

चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावरील मुरुमे दूर होतात. बर्फाला मसाज करण्यासाठी तुम्ही चेहरा धुवा आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटे बर्फाने चेहऱ्याला मसाज करा. बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्याने मुरुमांची समस्या दूर होते आणि त्वचा चमकदार होते.

बर्फाच्या मसाजने सुरकुत्या नियंत्रणात

बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. दिवसातून एकदा बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्याने सुरकुत्या दूर होतात.

काळी वर्तुळे दूर करा

काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रोज बर्फ लावा. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि काकडीचा रस एकत्र करून वापरा, त्वचेला फायदा होईल.