दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी रोज दात स्वच्छ करणे आवश्यक असते. पण असे करूनही अनेकांना दातांच्या पिवळेपणाचा त्रास होत असतो. यासाठी लोक जे नाही ते करायला तयार असतात. काहीजण वेगवेगळे उपचार देखील निवडतात.

पण खूप हे महाग असतात जे खिशाला परवडणारे नसतात. अशापरीस्थितीत त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता. यापैकी सर्वात प्रसिद्ध बेकिंग सोडा आहे. जो दातांना चमकदार करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. चला तर मग जाणून घेऊ चमकदार दातांसाठी ते कसे वापरावे.

दातांवर बेकिंग सोडा कसा वापरायचा

खोबरेल तेल आणि बेकिंग सोडा

नारळाचे तेल तोंडी फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. नारळाचे तेल दात पिवळे बनवणाऱ्या प्लेकपासून मुक्त होण्यास मदत करते. प्रत्येकी एक चमचा खोबरेल तेल आणि बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पेस्टने किमान २ मिनिटे दात घासून घ्या. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.

बेकिंग सोडा आणि पाणी

यासाठी एक चमचा बेकिंग सोडामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या टूथब्रशवर घ्या आणि दातांवर लावा. मिश्रणाला किमान एक मिनिट दातांवर काम करू द्या. नंतर पाण्याने तोंड धुवा. बेकिंग सोडा वापरल्याने तुमचे दात पांढरे होण्यास आणि प्लेक जमा होण्यास मदत होऊ शकते.

टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा

प्लाक, पोकळी आणि दात किडणे यापासून मुक्त होण्यासाठी फ्लोराईड-आधारित टूथपेस्टने दररोज दात घासून घ्या. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा घाला. त्यानंतर २ ते ३ मिनिटे दात घासून घ्या. पाण्याने तोंड धुवा. हे आठवड्यातून दोनदा किमान महिनाभर करा.

बेकिंग सोडा आणि मीठ

मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे तसेच त्यात प्रतिजैविक गुणधर्म आहेत. दात निष्कलंक करण्यासाठी बेकिंग सोडा मिठात मिसळा. या मिश्रणाचा थोडासा भाग बोटावर घ्या आणि दातांना चोळा. दातांवर २-३ मिनिटे काम करू द्या. नंतर पाण्याने तोंड धुवा. हे किमान एक आठवडा वापरा.

या गोष्टींची काळजी घ्या

-बेकिंग सोडा दातांवर कोरडा पडत असेल तर हिरड्यांवर ब्रश करू नका, असे केल्याने जळजळ किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो.

-बेकिंग सोडा नेहमी कोणत्याही गोष्टीत मिसळून वापरा.

-दीर्घकाळ वापरणे टाळा. असे केल्याने तुमच्या दातांची इनॅमल खराब होऊ शकते.