नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत, हे दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर निशाणा साधताना दिसतात, अभिनेत्री ऋषभ पंतबद्दल एक वक्तव्य केले होते, ज्यानंतर दोघांमधला हा वाद पेटून उठला, आणि तो सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर आला.

या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांमध्ये तू-तू-मैं-मैं अशी जोरदार चर्चा रंगली होती. आता इतक्या दिवसानंतर अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर आपले मौन सोडले आणि ती कोणत्या आरपीबद्दल बोलली हे सांगितले.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना उर्वशी म्हणाली, “आरपी माझी को-स्टार आहे आणि तिचे पूर्ण रूप राम पोथीनेनी आहे. ऋषभ पंतला देखील आरपी म्हणूनही ओळखले जाते हे मला माहीत नव्हते. लोकांनी फक्त अंदाज बांधला आणि त्याबद्दल लिहायला सुरुवात केली. जे अशा अफवांवर विश्वास ठेवतात त्यांना मी म्हणेन की त्यांनी संशोधन करणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट तुम्ही पाहिली नसेल किंवा फक्त एखादा youtuber किंवा कोणीतरी म्हणत असेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा?

या वादामुळे सतत ट्रोल आणि खिल्ली उडवली जात असताना, उर्वशी रौतेला म्हणाली, ‘आम्ही नेहमीच पाहतो की, क्रिकेटर्सपेक्षा अभिनेत्यांना अधिक आदर दिला जातो किंवा ते आपल्यापेक्षा जास्त कमावतात आणि याचा मला त्रास होतो. मला समजते की ते देशासाठी खेळतात आणि त्यांना खूप प्रेम आणि आदर मिळतो, पण कलाकारांनीही खूप काही केले आहे. त्यांनी देशाचे प्रतिनिधित्वही केले आहे. हे मी स्वतः अनेकदा केले आहे. पण मला या मूर्ख तुलना आवडत नाहीत.