मुंबई : उर्वशी रौतेला अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या चित्रपटांसाठी कमी पण तिच्या नात्याबद्दल जास्त चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंतसोबत अनेकदा जोडले गेले आहे. याशिवाय या दोघांमधील भांडणही चव्हाट्यावर आले आहे. पण आता उर्वशीचे मन दुसऱ्याच देशातील क्रिकेटरवर आल्याचे दिसते आहे, तिने सोशल मीडियावर त्या क्रिकेटरचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.

उर्वशी ट्रोल झाली

उर्वशी रौतेला जेव्हा भारताचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली तेव्हापासून ती ट्रोल होऊ लागली, अशातच ऋषभ आणि उर्वशी रौतेला यांच्यातील शीतयुद्धही थांबले नव्हते की उर्वशीचे मन पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहवर आले. अशा परिस्थितीत उर्वशी स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने इन्स्टावर एका फॅन पेजची पोस्टही शेअर केली आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय चाहत्यांना हळहळ वाटली. ट्रोलर्सनी ट्विटरवर मीम्स बनवून नसीम, ​​उर्वशी आणि ऋषभ यांचा लव्ह ट्रँगल दाखवला आहे.

उर्वशी नसीमपेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे

उर्वशी रौतेला 28 वर्षांची आहे, तर नसीम शाह 19 वर्षांचा आहे. ऋषभ पंत बद्दल बोलायचे झाले तर तो फक्त 24 वर्षांचा आहे. एका मीममध्ये तर उर्वशीवर निशाणा साधत हा लव्ह अँगल चुकीचा सांगितला आहे. ‘छोटू भैया’ आणि ‘दीदी’ ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील भांडण आता लव ट्रँगलमध्ये बदलले आहे. आता यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहचीही एन्ट्री झाली आहे.