Upcoming Tata EV: तुम्ही जर स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा आगामी काळात त्यांच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करणार आहे.

याबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी एका मुलाखतीत माहिती दिलेली आहे. ते म्हणाले की, फ्लॅगशिप नेक्सॉनपेक्षा कमी किमतीत नवीन इलेक्ट्रिक कारची योजना आखली जात आहे, जी लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सध्या टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक पॅसेंजर कार मार्केटमध्ये 88% वाटा आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी कंपनी पुढील 12-18 महिन्यांत परवडणाऱ्या किमतीत जनरेशन-1 आणि जनरेशन-2 EV सह भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

या इलेक्ट्रिक कार्स ही लाँच करण्यात येणार आहेत

टाटा मोटर्स 2024 मध्ये मध्यम आकाराचे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) Tata Curvv आणि 2025 मध्ये AVINYA संकल्पनेवर आधारित त्याची जनरेशन-3 EV श्रेणी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Nexon EV आणि Tigor EV सारखी विद्यमान मॉडेल टाटा मोटर्ससाठी जनरेशन-1 उत्पादने आहेत कारण ती विद्यमान IC-इंजिन पॉवरट्रेनवर आधारित आहेत. जनरेशन-2 उत्पादने प्रगत प्लॅटफॉर्मवर तयार केली जातील, जी ईव्हीसाठी सर्वोत्तम आहे. पण ते पेट्रोल-डिझेल कार आणि इलेक्ट्रिक मॉडेल दोन्हीसाठी वापरले जाऊ शकतात.

टाटा दरवर्षी दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे

शैलेश चंद्र म्हणाले की, कंपनी पुढील पाच वर्षांत दरवर्षी दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने किंवा 10 नवीन ईव्ही लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ते पुढे म्हणाले की सर्वाधिक विकल्या जाणार्‍या Nexon EV पेक्षा “अधिक परवडणारे” मॉडेलवर काम चालू आहे.

या कारबाबत वर्षाच्या अखेरीस त्याची घोषणा केली जाऊ शकते आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात येऊ शकते. नवीन कार टाटा पंचावर आधारित असू शकते.