महाअपडेट टीम, 10 फेब्रुवारी 2022 : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापति पदी सतीश कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज सकाळी झालेल्या बैठकीत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत काका कोरेकर व संपूर्ण संचालक मंडळाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार श्री पोपटराव गावडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे, आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत काका कोरेकर सह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होतं.
या निवडीनंतर आ. अशोक पवार यांच्या हस्ते नूतन उपसभापती सतीश कोळपे यांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.