मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत महाविकास आघाडी सरकारच्या कामांची माहिती दिली.  त्यांनी जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, देशात भाजपनेही बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकांनी त्यांना झिडकारले. हिंदुहृदयसम्राट म्हणल्यावर एकच चेहरा जनतेसमोर येतो. तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासहोब ठाकरे यांचा.

हिंदू अडचणीत असताना कसलीही चिंता न करता मदतीसाठी जो धावून जातो, तो हिंदूहृदयसम्राट असतो. अशावेळी घरी बसून नंतर येत प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रियासम्राट होऊ शकतात. ते हिंदुहृदसम्राट होऊ शकत नाही. तुम्हाला त्यांच्याबाबत एवढा आदर असलेत तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी काही दिवसांपूर्वी पोस्टर्स झळकावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. राज ठाकरे यांनी त्याचवेळी आपल्या मनसैनिकांना ‘हिंदुहृदयसम्राट’ केवळ एकच आहेत. पुन्हा असे प्रकार करू नका असे बजावले होते.

तर, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आघाडी सरकार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही शिवसेनेवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणाला भाजपणे समर्थन दिले तर, आघाडीच्या नेत्यांनी मनसे ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला होता.

Leave a comment

Your email address will not be published.