२१ फेब्रुवारी रोजी खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावे म्हणून शासनाने १० वी करीता ७ वी – ८ वी व १२ वी करीता ९ वी – १० वीतील सहभाग लक्षात घेऊन राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे मागणीवरून ग्रेसगुण देण्याबाबत आदेशित केले.

मात्र प्रत्येक जिल्हयात वेगवेगळा अर्थ लावून ग्रेसगुणांबाबत भिन्न भिन्न प्रवाह जिल्हा क्रीडाधिकारी यांचेत दिसून आले. शासनाने उदभवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे स्पर्धा न झाल्याने सहभागाचा विचार करून गुण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन खेळाडूंना दिलासा दिला .

पण शासन निर्णयाला तिलांजली देत क्रीडा आयुक्तांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे १२ वीतील खेळाडू स्पर्धा न झाल्याकारणाने ग्रेस गुणांपासून वंचित राहिले.

स्पर्धा होणार या आशेने खेळाडूंनी या वर्षी खेळाचा भरपूर सराव केला मात्र स्पर्धा न झाल्याने ना स्पर्धा ना ग्रेसगुण त्यामुळे फक्त निराशा पदरी पडली.

त्यातच अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शक सूचनांमुळे खेळाडूंची चूक नसताना ग्रेसगुणांपासून वंचित राहिल्याने खेळाडू मानसिक दडपणात आले असून परीक्षेत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांकडून दडपणाखाली अघडीत प्रकार घडण्याची शक्यता आहे.

यामुळे मंत्रालय मुंबई येथे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड , राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांची महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ व माननीय प्रेम दादा दरेकर यांचे उपस्थितीत भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

राज्यातील बारावीतील खेळाडूंना क्रीडा सवलत ग्रेस गुण नक्कीच मिळतील कोणत्याही खेळाडू विद्यार्थ्यां वर अन्याय होणार नाही अशी ग्वाही माननीय वर्षा ताई गायकवाड यांनी दिली.

मंत्रालयीन सहसचिव काझी साहेब व आयुक्त यांचे समवेत चर्चा करून मार्ग नक्कीच काढू पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे सांगितले.

मागील आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांची पूणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाचे सह सचिव श्री शिवदत्त ढवळे , राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, मच्छिंद्र ओव्हळ यांनी भेट घेतली होती.

तसेच मंत्रालयात शिवदत्त ढवळे व सहकाऱ्यांनी अप्पर सचिव रस्तोगी, सचिव काझी, सचिव स्वाती नानल यांची भेट घेऊन चर्चा केली.

तसेच शिक्षणमंत्री बच्चूभाऊ तथा ओमप्रकाश कडू साहेबांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर संबंधितांना आदेश देण्याबाबत विनंती करण्यात आली.

Leave a comment

Your email address will not be published.