प्रत्येकजण आपापल्या केसांची वेगवेगळ्या पद्धतीने निगा राखत असतो. परंतु तरीसुद्धा केसांच्या वेगवेगळ्या समस्या होतच असतात. केस गळती, लवकरच केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे अशा अनेक समस्या केसांमध्ये उद्भवत असतात.
त्यात महत्वाची म्हणजे केसात कोंडा होणे या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.पण जर तुम्हाला ही समस्या दूर करायची असेल तर घरगुती उपाय म्हणून स्वयंपाकघरातील भाज्यांमधील ‘आले’ वापरू शकता.आले केसांसाठी खूप गुणकारी मानले जाते.
त्यामुळे केसांमधील झालेला कोंडा दूर होण्यास मदत होईल. तर जाणून घेऊया आल्याचा वापर केसांसाठी कशा पद्धतीने करावा व आले केसांवर कसे लावावे.
तेलासोबत वापर करा
आपण तेलासह आले वापरू शकता. जर तुमच्या टाळूची त्वचा संवेदनशील असेल आणि आल्याचा रस थेट लावून तुम्हाला समस्या येत असतील, तर तुम्ही आल्याचा रस तेलात मिसळून लावू शकता. याचा नियमित वापर केल्याने लवकरच तुमचा कोंडा दूर होईल.
आल्याचा वापर अशा प्रकारेही करता येतो
याशिवाय जर तुम्हाला केस आणि टाळूवर आले अतिशय सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने लावायचे असेल, तर ही पद्धत सर्वोत्तम ठरू शकते. यासाठी थोडा सल्फेट फ्री शॅम्पू मध्ये एक चमचा आल्याचा रस घाला. याचे मिश्रण करून केसांना लावा. याने केवळ कोंडा दूर होणार नाही. तर, तुमचे केसही मोकळे व तंदुरुस्त होतील.