नागपूर, दि. १९ : विधानसभेचे माजी सदस्य आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने संमती दिली. या सर्व माजी सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृह अतिव दुःख व्यक्त करित आहे, अशा भावना अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडतांना व्यक्त केल्या.

यावेळी माणिकराव होडल्या गावीत (नवापूर, नंदुरबार), किसनराव नानासाहेब देशमुख  (अहमदपूर),  तुकाराम गंगाधर गडाख (शेवगाव, अहमदनगर), विनायक महादेव निम्हण (शिवाजीनगर, पुणे), दिगंबर बाळोबा भेगडे (मावळ, पुणे), सोपानराव तुकाराम फुगे (हवेली, पुणे), श्रीनिवासराव ऊर्फ बापूसाहेब बाळाजीराव देशमुख गोरठेकर (भोकर, नांदेड), विठ्ठलराव सोनाजी पाटील (बुलढाणा) व श्रीमती ॲनी सितम्बलम शेखर (कुलाबा) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.