मुंबई : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी अलीकडेच ट्विटरची मालकी घेतली आहे, त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने शुक्रवारी ट्विटरवर इलॉन मस्क ला फूड डिलिव्हरी अॅप स्विगी विकत घेण्याची देखील विनंती केली. स्विगीच्या फूड डिलिव्हरीबद्दल शुभमन गिल खूपच नाराज दिसत आहे. फूड डिलिव्हरी उशीर झाल्यामुळे त्याने इलॉन मस्क यांना ही विनंती केली आहे.
खरं तर, ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेटर शुभमन गिलनेही ट्विट केले आहे. शुभमनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने इलॉन मस्क फूड डिलिव्हरी अॅप स्विगी घेण्याचे आवाहन केले आहे.
Elon musk, please buy swiggy so they can deliver on time. @elonmusk #swiggy
— Shubman Gill (@ShubmanGill) April 29, 2022
शुभमन गिलने ट्विट करून लिहिले, “इलॉन मस्क , कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून ते वेळेवर डिलिव्हरी करू शकतील.” शुभमन गिलने शुक्रवारी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट केली आहे. त्याचवेळी, या पोस्टमध्ये तो स्विगीवर वेळेवर अन्न पोहोचवू न शकल्याने नाराज दिसत आहे. यामुळे त्याने मजेशीर पद्धतीने ही पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.
शुभमनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण शुभमनलाच ट्रोल करत आहेत. तर काही जणांनी त्याच्या या पोस्टला संमती दर्शवली आहे.