वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत जाते. अशातूनही आपल्याला आपले शरीर फिट आणि निरोगी ठेवायचे असते. यासाठी आपली जीवनशैली आणि आरोग्यास योग्य आहार या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.

एकाच जागी जास्तवेळ बसून रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, संधिवात यांसारख्या आजाराच्या समस्यांचा धोका वाढू लागतो. यामुळे वयाच्या ४० वर्षांवरील लोक स्वतःला फिट व तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. अशाच काही गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहोत ज्याने वयाच्या ४० शी नंतरही तुम्ही निरोगी राहाल.

संतुलित आहार घ्या

लठ्ठपणा, मधुमेह आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांसह प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करा.

नियमित व्यायाम करा

नियमित चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे किंवा जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी फंक्शनल ट्रेनिंग आणि रोटेशनमध्ये योगासह झुंबा यांसारख्या गोष्टी तुमच्या सवयीमध्ये जोडणे. ट्रेकिंग किंवा पोहणे आणि बागकाम यासारख्या व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो .

वाचा आणि ध्यान करा

वाचन, मनन आणि संगीत आपल्या मनःस्थितीसाठी खूप चांगले आहे. मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद वाढवू शकतो. निवृत्त होण्याची वाट न पाहता छंद जोपासा. डिजिटल डिटॉक्ससह ६-७ तासांच्या अखंड झोपेची खात्री करा.

नियमितपणे तपासणी करून घ्या

तुमचे वजन, बीएमआय, बीपी, साखर, यासारख्या तपासण्या करून घ्या. दरवर्षी या आरोग्य तपासणी करा, ज्यामध्ये हृदयाचे मूल्यांकन देखील समाविष्ट आहे.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा कारण ते काही काळ आराम देऊ शकतात, परंतु दीर्घकाळ त्यांचे सेवन तुम्हाला गंभीर आजारांकडे ढकलते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *