कडक उन्हामुळे शरीरातुन घामाच्या धारा टपटप करून वाहू लागतात. याने संपूर्ण कपडे ओलसर होतात. त्यामुळे आपल्या शरीरातून घामाचा वास येतो. यासाठी अनेकजण बाजारातील वेगवेगळ्या प्रकारचे डियो, सेंट, यांचा वापर करून दुर्गंध घालवण्याचा प्रयत्न करतात. पण हे आपल्या त्वचेसाठी अपायकारक असते.
त्यामुळे शरीरातील घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही त्यावर घरगुती उपायही करू शकतात. यासंबंधित काही घरगुती व नैसर्गिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुमच्या शरीरातील घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ याविषयी घरगुती व नसर्गिक उपाय.
१. उन्हाळ्यात कांदा, मांसाहार, अंडी, मासे, लसूण यासारख्या गोष्टी खाणे टाळा. याचे सेवन न केल्याने घामही बर्याच प्रमाणात कमी होतो.
२. तुम्हाला कोणीतरी सांगितले असेल की तुम्ही अधिकाधिक पाणी प्या. पण मोजकेच लोक हे ऐकतात आणि फॉलो करतात. दिवसभरात किमान ९ ते १० ग्लास पाणी प्यायल्यास लघवीद्वारे शरीरातील घाण बाहेर पडते. यामुळे शरीरातून कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही.
३. तुम्ही आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा, गुलाबजल, लिंबू किंवा तुरटी मिक्स करू शकता. त्यामुळे तुमच्या घामाचा वास सुटणार नाही. आंघोळ करताना पाय चांगले धुवा. अनेक वेळा शूज काढल्यानंतरही पायाचा वास येऊ लागतो.
४. पहाटे सगळ्यांना ऑफिसला जाण्याची घाई असते. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी एका टबमध्ये ३ चमचे बेकिंग सोडा टाका आणि एका कपड्याच्या मदतीने संपूर्ण शरीर पुसून टाका. तुमची दुर्गंधी दूर होईल.
५. टी ट्री ऑइलमध्ये असलेले घटक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तुम्ही याचे दोन थेंब पाण्यात मिसळून ते कापसाच्या साहाय्याने काखेखाली लावू शकता.