उन्हाळ्यात तीव्र उन्हाने चेहऱ्याच्या अनेक समस्या जाणवत असतात. यासाठी त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी प्रत्येकजण ग्लोइंग व चमकदार त्वचेसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. तर अनेकजण महागड्या सौंदर्य प्रसाधनांचाही वापर करतात. पण तरी देखील पाहिजे असा ग्लो भेटत नाही.

त्वचा तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे त्वचेला सुधारण्यासाठी रात्रीची वेळ खूप फायदेशीर असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी चेहऱ्यावर प्रभावी उपाय म्हणून अशा चार गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुमचा चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.

तसेच बाजारातील रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनांमुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा, काळे डाग इत्यादी समस्या वाढू शकतात. या समस्या दूर करण्यासाठी देखील या गोष्टींचा चांगला वापर होतो. या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही नैसर्गिक चमक मिळवू शकता.

१. मध

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी मधामध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळा. असे केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होऊन चेहरा उजळतो.

२. कोरफड

कोरफड तुम्हाला चेहऱ्यावरील डाग दूर करण्यात मदत करेल. दररोज एलोवेरा जेल चेहऱ्यावर थोडा वेळ लावा आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

३. लिंबू

लिंबू आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट रंग वाढवण्याचे काम करतात. लिंबाचा रस चेहऱ्यावर थोडा वेळ लावा आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

४. टोमॅटो

टोमॅटो मधोमध कापून घ्या, दोन्ही हातात घ्या आणि चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत फिरवत काही वेळ हलक्या हातांनी घासून घ्या. त्यानंतर १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने धुवावे. याने चेहरा अधिक उजळेल.

Leave a comment

Your email address will not be published.