नवी दिल्ली : हार्दिक पांड्या मैदानावर ज्या प्रकारे शांत स्वभावाने जगतो, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही त्याच्याबाबत वक्तव्य केले आहे. हार्दिक पांड्या भविष्यात टीम इंडियाचे नेतृत्व करेल असेही हरभजन सिंगने म्हटले आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने संघाला विजय मिळवून दिला होता.

स्पोर्ट्सशी संवाद साधताना हरभजन सिंगने हार्दिक पांड्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आणि म्हणाला, त्याने कर्णधार व्हावे, मला वाटते तो कर्णधार होईल. अलीकडच्या काळात त्याने वेगळाच अवतार दाखवला आहे. तो एमएस धोनीसारखा झाला आहे, तो खूप शांत आहे. तो चांगली फलंदाजी करत असून त्याला त्याच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे.

हरभजन म्हणाला की, हार्दिक हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे ज्यामध्ये एक चांगला कर्णधार बनण्याची सर्व क्षमता आहे. तो म्हणाला की जेव्हा तो फलंदाजीसाठी बाहेर पडतो तेव्हा एक वेगळाच स्वॅग असतो. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असून संघासाठी विजय मिळवण्यासाठी त्याला काय करावे लागेल हे त्याला ठाऊक आहे. मी त्याला कर्णधार म्हणून पाहतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आणि आयपीएलमध्ये त्याने ज्या प्रकारचा स्वभाव दाखवला, तो विलक्षण आहे. मला वाटते राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत.

विशेष म्हणजे आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी करताना ३ विकेट घेतल्या यानंतर त्याने पुन्हा एकदा फलंदाजीत आपली चुणूक दाखवली. त्याने टीम इंडियाला षटकार मारून सामना जिंकून दिला. पंड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. अशाप्रकारे त्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.